Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लसीकरणासाठी ५ लाख ९५ हजार फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:08 IST

मुंबई : राज्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत एकूण ४ लाख ७२ हजार ८०५ लाभार्थ्यांना ...

मुंबई : राज्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत एकूण ४ लाख ७२ हजार ८०५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचेही लसीकरण सुरू झाले आहे. या लसीकरणाला अधिकाधिक प्रतिसाद मिळावा याकरिता राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी आतापर्यंत ५ लाख ९५ हजार ६५६ कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे, यापैकी १ लाख ७० हजार मुंबईतील कर्मचारी आहेत.

राज्यात महसूल विभागातील ३० हजार ९७४, गृह विभागातील २ लाख ६८ हजार २८९ आणि गृहनिर्माण व शहरी कामकाज विभागातील २ लाख ९६ हजार ९८४ कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यात नोंदणी करण्यात आलेल्या ५ लाख ९५ हजार फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपैकी २५ हजार ६६० कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. राज्यात ३ फ्रेबुवारीला दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाले, त्यात ३ फेब्रुवारीला ७९३, ४ फेब्रुवारीला ३ हजार ९२५ , ५ फेब्रुवारीला ८ हजार ७२९ आणि ६ फेब्रुवारी रोजी १२ हजार १२ हजार १५३ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

आतापर्यंत राज्यातील ४ लाख ७२ हजार ८०५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे, त्यात ३ लाख ५१ हजार ४८ कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली आहे, तर ३ हजार ५४५ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली.

.......................