Join us  

पैसे देण्यास नकार दिल्याने विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 6:13 AM

परदेशात मॉडेल होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाला आयएमओ अ‍ॅपवरून कॉल आला.

मुंबई : परदेशात मॉडेल होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाला आयएमओ अ‍ॅपवरून कॉल आला. कॉलधारकाने मॉडेलिंगबाबत चर्चा करत, कपडे काढून बॉडी दाखविण्यास सांगितले. मॉडेल होण्याची संधी मिळेल या आशेने, तरुण विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ देण्यास तयार झाला. कॉलधारकाने व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक घेत फोन ठेवला. थोड्या वेळाने पुन्हा कॉल करत, तरुणाचा फेक आयडी तयार करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत, बिटकॉइनद्वारे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच त्याचा विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार कुर्ला येथे उघडकीस आला आहे.कुर्ला परिसरात राहणारा २६ वर्षीय रमेश (नावात बदल) मॉडेलिंग कॉर्डिनेटरचे काम करतो. त्याच्या वडिलांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. परदेशातील एका नामांकित मॉडेलिंगच्या कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून ठगाने इन्स्टाग्रामवर रमेशशी ओळख करून घेतली व नंतर संपर्क वाढवला. त्याच ओळखीतून परदेशात मॉडेलिंगची संधी देण्याचे स्वप्न दाखवले. नंतर १७ तारखेला त्याच्या मोबाइलवर आयएमओ अ‍ॅपवरून त्याला कॉल आला. समोरच्या व्यक्तीने मॉडेलिंग करता का, याबाबत विचारणा केली. रमेशने होकार देताच, संपूर्ण बॉडी दाखविण्यास सांगितले. मॉडेल म्हणून संधी मिळेल या आनंदात रमेशने विवस्त्र होत बॉडी दाखवली.कॉलधारकाने त्याचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक घेत, लवकरच कॉल करतो असे सांगितले. त्यानंतर ठरल्यानुसार पुन्हा कॉल केला. रमेशचे इन्स्टाग्रामवर बनावट नावाने खाते तयार केले असून, त्यात विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ शेअर करणार असल्याची धमकी दिली. हा व्हिडीओ थांबवायचा असल्यास बिटकॉइनद्वारे पैशांची मागणी केली.रमेशने पैसे देण्यास नकार देताच ठगाने बनावट आयडीवरून त्याचा विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ शेअर केला. तो पाहताच रमेशला मानसिक धक्का बसला. त्याने घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी थेट कुर्ला पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.>फेक आयडीवरून तपास सुरूआरोपीने झहुर अल्ली सय्यद या नावाने इन्स्टाग्रामवर रमेशचे बनावट आयडी तयार केले आणि त्यावरूनच त्याचे व्हिडीओ शेअर केले. कुर्ला पोलीस सध्या याच आयडीच्या लिंकवरून याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.