Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाकडून अनामत रकमेचा परतावा

By admin | Updated: June 9, 2015 01:53 IST

सोडतीतील अयशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांच्या अनामत रकमेचा परतावा संबंधित अर्जदाराच्या खात्यावर सोमवारी जमा करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई आणि कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे विविध उत्पन्न गटासाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील अयशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांच्या अनामत रकमेचा परतावा संबंधित अर्जदाराच्या खात्यावर सोमवारी जमा करण्यात आला आहे. तरी सर्व अर्जदारांनी त्यांच्या खात्यावर अनामत रक्कम जमा झाल्याची खात्री करावी, असे आवाहन म्हाडाने केले आहे. म्हाडाने अनामत रकमेच्या रूपात मुंबई मंडळातील अर्जदारांच्या खात्यांवर एकूण ३४१ कोटी ६३ लाख ३३ हजार रुपये तर कोकण मंडळातील अर्जदारांच्या खात्यावर १ कोटी ६६ लाख ६५ हजार रुपये जमा केले आहेत. अयशस्वी व प्रतीक्षा यादीतील ज्या अर्जदारांचा परतावा जमा झालेला नाही, अशा अर्जदारांनी म्हाडाच्या ९८६९९८८००० या क्रमांकावर किंवा ८िूङ्मे‘३ेु@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेल आयडीवर सूचना नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.