Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यांत पारदर्शक कामांचे ‘प्रतिबिंब’

By admin | Updated: August 4, 2014 00:44 IST

वेब बेस असलेल्या या केआॅक्सचे यंत्र ठाणे आणि पालघरमधील सर्व उपविभागात तसेच तहसील, प्रांत, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या ठिकाणी अशा ६३ ठिकाणी बसविण्यात आले आहे

जितेंद्र कालेकर, ठाणेप्रशासकीय कामात पारदर्शकता आणि गतिमानता येण्यासाठी तसेच नागरिकांना त्यांच्या कोणत्याही अर्जाची माहिती एका क्लिकवर मोफत मिळण्यासाठी ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये केआॅक्स अर्थात ‘प्रतिबिंंब’ ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ‘प्रतिबिंंब’मुळे अर्जाच्या स्थितीची माहिती ‘ठाणे प्रवाह’ या संकेतस्थळावरुन इत्थंभूतपणे मिळणार असल्यामुळे नागरिकांच्या वेळ आणि खर्चातही बचत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.काय होणार प्रतिबिंंबचा उपयोग... वेब बेस असलेल्या या केआॅक्सचे यंत्र ठाणे आणि पालघरमधील सर्व उपविभागात तसेच तहसील, प्रांत, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या ठिकाणी अशा ६३ ठिकाणी बसविण्यात आले आहे. ६६६.३ँंल्ली.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील विविध विभागांची माहिती घेता येणार आहे. यातून विविध योजनांची तपशीलवार माहिती मिळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होणारी भरती प्रक्रिया, तिची सद्य:स्थिती, निकाल आणि कर्मचाऱ्यांची बढती, आदेश आणि कामांच्या निविदा प्रक्रियेची माहिती उपलब्ध होणार आहे. तर ६६६.३ँंल्लील्लंङ्मल्ल’्रल्ली.ूङ्मे या संकेतस्थळाद्वारे बिनशेती अर्जाचा प्रवास , त्याची सद्य:स्थिती व निर्णयांची माहिती उपलब्ध होणार आहे. ६६६.३ँंल्लीस्र१ं५ंँ.ूङ्मे या संकेतस्थळाद्वारे जिल्हा कार्यालयात सादर केलेल्या प्रत्येक अर्जाची संपूर्ण माहिती अर्जदारांना टपाल शाखेतून मिळालेल्या १४ अंकी बारकोड क्रमांकाच्या आधारे प्राप्त होणार आहे. त्याआधारे कोणत्याही अर्जाची माहिती कुठे आणि कोणत्या ठिकाणी आहे, ती कोणत्या कारणास्तव कोणत्या अधिकाऱ्याने नाकारली किंवा मंजूर केली, याची माहिती बारकोडच्या आधारे अर्जदाराला मिळणार आहे. याशिवाय,   www.thaneelcetion.com या संकेतस्थळावर जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतदारांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)