Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात यंदा 24 लाखांनी गाळप कमी

By admin | Updated: June 6, 2014 00:06 IST

राज्यातील ऊस हंगामाचे सूप वाजले असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा 24 लाख टन गाळप कमी झाले.

विश्वास पाटील  - कोल्हापूर
राज्यातील ऊस हंगामाचे सूप वाजले असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा 24 लाख टन गाळप कमी झाले. ऊस आंदोलनाचा संघर्ष व पडलेले साखरेचे दर वगळता यंदाचा हंगाम अन्य कोणत्या फारशा अडचणींशिवाय आटोपला. हंगाम लांबला तरी शेतक:यांनी पिकवलेल्या सगळ्या उसाचे गाळप झाले हे देखील महत्त्वाचे आहे. गतवर्षीचा हंगाम 27 एप्रिलला संपला होता, यंदा तो तब्बल महिनाभर लांबला.
राज्यात यंदा 61 खासगी व 96 सहकारी, असे 157 कारखाने सुरू होते. त्यांची प्रतिदिन गाळप क्षमता 4 लाख 63 हजार 9क्क् टन इतकी आहे. या कारखान्यांनी 676 लाख टन उसाचे गाळप केले व त्यातून 77क् लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सरासरी साखर उतारा 11.4क् इतका राहिला. 
सध्या फक्त नागपूरचा केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांचा पूर्ती पॉवर अँड शुगर उमरेड हा खासगी कारखाना सुरू आहे. 5क्क् ते 6क्क् टन ऊस या कारखान्याकडे शिल्लक असल्याने बहुधा बुधवार्पयत हा कारखानाही बंद होईल. यंदा राज्य शासनाने हंगामाच्या सुरुवातीला 7क्क् लाख टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज वर्तवला होता. परंतु तेवढे गाळप झाले नाही.
 पहिल्या उचलीचा तिढा लवकर न सुटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यत: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार आंदोलन झाले. त्यामुळे हंगाम तब्बल 4क् दिवस पुढे गेला. त्याचा परिणाम म्हणून एप्रिलअखेर संपणारा हंगाम यंदा मे अखेर्पयत सुरू राहिला. आंदोलन झाले, उचल ठरली. परंतु बाजारात साखरेचे दरच नसल्याने केंद्र शासनाकडून कर्ज घेऊन कारखान्यांना ‘एफआरपी’ द्यावी लागली. त्यामुळे पहिली उचल हीच यंदाचे अंतिम बिल ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या महिन्यात साखरेचे दर 32क्क् र्पयत वाढले होते. त्यामुळे कारखानदारी खुशीत होती. परंतु पुन्हा हे दर 27क्क् रुपये क्विंटलर्पयत घसरल्याने कारखानदारीच्या चिंता वाढवल्या आहेत.
यंदाचा हंगाम संपला असला तरी साखर उद्योगाचे प्रश्न संपलेले नाहीत. त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय सहकारी साखर महासंघाने नवे केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यांनी येत्या आठवडय़ात भेटीसाठी वेळ दिली आहे. आयात कर वाढवा, निर्यात अनुदान पूर्वी क्विंटलला 333 रुपये होते, ते आता 227 र्पयत कमी केले असून, ते पूर्ववत वाढवा, अशा काही महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात महासंघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ भेटणार आहे, असे निवृत्त कार्यकारी संचालक पी. जी. मेढे यांनी सांगितले.
यंदाचा हंगाम नियोजनानुसार पार पडला असून, पुढील हंगामातील प्रश्न, ऊस नोंदी याशिवाय विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी 7 जूनला पुण्यात साखर आयुक्त कार्यालयात बैठक होत आहे. त्यास साखर आयुक्त व कृषी आयुक्त उपस्थित राहणार आहेत, असे पुण्याचे सहसंचालक (विकास) साखर आयुक्तालय पांडुरंग शेळके 
म्हणाले.
 
- जवाहर शेतकरी सहकारी, हुपरी : 14 लाख 28 हजार 888 टन.
- वारणा सहकारी, वारणानगर : 14 लाख 24 हजार 861 टन.
- सहय़ाद्री सहकारी, कराड : 13 लाख 28 हजार 616 टन.
 
- सदाशिवराव मंडलिक सहकारी, हमीदवाडा (ता. कागल) : 13.38 टक्के
- दूधगंगा-वेदगंगा सहकारी, बिद्री (ता. कागल) : 13.35 टक्के
- कुंभी-कासारी सहकारी, कुडित्रे (ता. करवीर) : 13.33 टक्के