मुंबई : अभिनेता शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याशेजारी बांधलेला बेकायदा रॅम्प वांद्रेच्या रहिवाशांसाठी गैरसोयीचा ठरत असून, तो सात दिवसात तोडावा अशी नोटीस पालिकेने दिली आहे. त्यानंतर पालिका स्वत:च हा रॅम्प तोडेल असा इशारा दिला आहे. वांद्रे, बॅण्डस्टँड येथे शाहरूख खानचा प्रशस्त बंगला आहे़ या बंगल्यात त्याची महागडी वाहने ठेवण्यासाठी बाहेर रस्त्यावरच ९़५ मीटरचा रॅम्प बांधला आहे़ मात्र या रॅम्पमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची तक्रार रहिवाशांकडून होत होती़ या प्रकरणी खासदार पूनम महाजन यांनीच काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र लिहिले होते़ माऊंट मेरी चर्चपर्यंत जाणाऱ्या जिन्यांचा मार्गच या रॅम्पमुळे अडविला जात आहे़ त्यामुळे हा रॅम्प तोडण्याची सूचना खासदारांनी केल्यामुळे पालिकेने पावले उचलत हा रॅम्प तोडण्यासाठी शाहरूखला नोटीस पाठविली. याबाबत शाहरूखचे नाव थेट घेण्यात येत नसले तरी वृत्ताला पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे़ (प्रतिनिधी)मन्नतची खासियतपुरातन वास्तू असलेला हा बंगला शाहरूख खानने २००१मध्ये एका ट्रस्टकडून खरेदी केला़ त्यानंतर या बंगल्याचे नाव ‘मन्नत’ असे ठेवण्यात आले़ या प्रशस्त बंगल्यामध्ये सर्व सुखसोयी ठेवण्यासाठी शाहरूखने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.सहा महिन्यांपूर्वीच झालेली कारवाईहा रॅम्प ९़५ मीटरऐवजी कमी करून ६ मीटर करण्याची सूचना पालिकेने केली होती़ मात्र याची दखल शाहरूखने न घेतल्यामुळे पालिकेने सहा महिन्यांपूर्वी कारवाई केली होती़ तरीही परत हा रॅम्प तयार केला़ या वेळेस खासदारानेच पत्र पाठविल्यामुळे पालिकेच्या एच पश्चिम विभागाने सात दिवसांत हा रॅम्प तोडण्याची ताकीद दिली आहे़ अन्यथा पालिका स्वत: या रॅम्पवर कारवाई करेल, असा इशाराही दिला आहे़
रॅम्पची रुंदी कमी करण्याची शाहरूखला ताकीद
By admin | Updated: February 6, 2015 01:31 IST