Join us  

संक्रमण शिबिरांच्या पुनर्विकासातून १० हजार संक्रमण गाळे उपलब्ध होणार, म्हाडा करतेय विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 2:12 AM

Mhada News : म्हाडाकडे ५८ संक्रमण शिबिरे आहेत. म्हाडा ती विकसित करत आहे. २० संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास झाला आहे. यातील घरे लॉटरीसाठी वापरली जात आहेत.

मुंबई : मुंबईत पुनर्विकासासाठी संक्रमण शिबिरांची गरज असून, म्हाडाकडील ५८ पैकी २० संक्रमण शिबिरे विकसित झाली. या २० ठिकाणी १२ हजार गाळे होते. विकास करताना सुमारे ७ हजार गाळे मिळाले. प्रत्यक्षात ही संख्या अधिक हवी होती. मात्र आता यामध्ये कशी वाढ होईल याकडे लक्ष दिले जात असून, मुंबईतील संक्रमण शिबिराचा पुनर्विकास करताना १० हजार संक्रमण गाळे उपलब्ध होतील, या दिशेन म्हाडा विचार करत आहे.मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. म्हाडाकडे ५८ संक्रमण शिबिरे आहेत. म्हाडा ती विकसित करत आहे. २० संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास झाला आहे. यातील घरे लॉटरीसाठी वापरली जात आहेत. काही मास्टर लिस्टसाठी वापरली जात आहेत. शिबिराची जमीन मुंबई मंडळाच्या ताब्यात आहे. २० संक्रमण शिबिराचे १२ हजार १४७ गाळे होते. विकास झाला तेव्हा सुमारे साडेचार हजार गाळे कमी झाले. आज अनेक इमारतींना धोकादायक म्हणून नोटीस दिल्या आहेत. उद्या एखादी आपत्ती आली तर संक्रमण शिबिर उपलब्ध नसल्याने अडचण येईल. म्हणून आता अधिकाधिक संक्रमण शिबिरे उपलब्ध होतील यावर भर दिला जात आहे. मुंबईतील संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास करताना १० हजार संक्रमण गाळे उपलब्ध होतील, असे नियोजन केले जात आहे. यातून अधिकाधिक घरे, गाळे उपलब्ध होतील याचा प्रयत्न केला जाईल.खासगी विकासकांकडेदेखील काही संक्रमण शिबिरे आहेत. गिरणीच्या जमिनीवरही संक्रमण शिबिरे आहेत. दरम्यान, खासगी विकासकांचा विचार करता २०० कोटी थकबाकी होती. कार्यवाही केली तेव्हा ९५ कोटी वसूल झाले आहेत. १२५ कोटींवर विकासकांनी भाडे भरले आहे. ज्यांनी भाडे भरले नाही त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईम्हाडा