Join us

सिरी रोड विस्तारास सेनेचा ‘रेड सिग्नल’

By admin | Updated: December 30, 2015 01:21 IST

मलबार हिल येथील कमला नेहरू पार्कच्या भूखंडातून जाणाऱ्या रस्त्याचा प्रस्ताव विरोधी पक्षांच्या मदतीने शिवसेनेनेच मंगळवारी फेटाळून लावला़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रस्त्यासाठी आग्रही होते.

मुंबई : मलबार हिल येथील कमला नेहरू पार्कच्या भूखंडातून जाणाऱ्या रस्त्याचा प्रस्ताव विरोधी पक्षांच्या मदतीने शिवसेनेनेच मंगळवारी फेटाळून लावला़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रस्त्यासाठी आग्रही होते. मित्रपक्षानेच हा प्रकार केल्याने भाजपाची कोंडी झाली. त्यामुळे शिवसेना भाजपामध्ये आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत़कमला नेहरू पार्कमधून सध्या पायवाट असलेल्या सिरी रोडचा विस्तार करून थेट गिरगाव चौपाटीच्या नाक्यापर्यंत जोडण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे़ यामुळे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला ते मंत्रालयापर्यंतचा मार्ग सुकर होणार आहे़ याकरिता कमला नेहरू पार्कचा अडीच हजार मीटर भूखंड वापरता यावा, यासाठी आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव सुधार समितीपुढे मंगळवारी आला़मुख्यमंत्र्यांसाठी हा मार्ग सोपा असल्याने भाजपाने हा प्रस्ताव मंजूर करण्याचा हट्ट धरला़ मात्र या प्रकल्पात पार्कमधील ८० वृक्ष छाटले जाणार आहेत़ यामुळे राजकीय पक्ष व स्थानिकांनी विरोध सुरू केला आहे़ त्यामुळे आज या प्रस्तावावर सुधार समितीमध्ये वादळी चर्चा झाली़ शिवसेनेच्या सदस्यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याची सूचना केली़ सेना-भाजपाची अडवाअडवी । युतीचे पुनरुज्जीवन झाल्यानंतरही सेना-भाजपाने असहकाराचे धोरण कायम ठेवले आहे़ मालमत्ता कराचा सुधारित प्रस्ताव, पे अ‍ॅण्ड पार्क योजना, नाईट लाइफ, इमारतीच्या गच्चीवर रेस्टॉरेंट या शिवसेनेच्या प्रस्तावांना भाजपाने सुरुंग लावला़ त्यामुळे शिवसेनेनेही आता भाजपाचे प्रस्ताव रोखून धरण्याचे धोरण अवलंबिले आहे़ एलईडी पथदिव्यानंतर आता मुख्यमंत्र्यांसाठी तयार होणाऱ्या रस्त्याचा प्रस्ताव अडकवून शिवसेनेने भाजपाला मोठा धक्का दिला आहे़मतदानात भाजपाचा पराभवया प्रस्तावावर अखेर मतदान घेण्यात आले़ यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे एका बाजूला आणि भाजपाचे सदस्य व सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे एका बाजूला असे चित्र निर्माण झाले़ या मतदानात भाजपाच्या दोन सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे अखेर हा प्रस्ताव रद्द झाला़८० वृक्षांच्या प्रस्तावित छाटणीमुळे विरोधतीन बत्तीला जाणारा हा एकमेव रस्ता असल्याने याचा विस्तार झाल्यास वाहतुकीची समस्या सुटेल, असा दावा सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी केला़ परंतु एका बिल्डराच्या घशात हा भूखंड घालण्यासाठी हा प्रस्ताव तयार झाल्याचा आरोप करीत शिवसेनेने मित्रपक्षालाच दणका दिला़ मुख्यमंत्र्यांसाठी हा मार्ग सोपा असल्याने भाजपाने हा प्रस्ताव मंजूर करण्याचा हट्ट धरला़ मात्र या प्रकल्पात पार्कमधील ८० वृक्ष छाटले जाणार आहेत़ यामुळे राजकीय पक्ष व स्थानिकांनी विरोध सुरू केला आहे़