Join us  

केवळ एकच टक्क्याने वाढला रिकव्हरी रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2020 7:53 AM

सप्टेंबर ठरला धोकादायक : आढळले ६० हजारांहून अधिक रुग्ण

मुंबई : आॅगस्ट महिन्यात नियंत्रणात आलेला कोरोनाचा प्रादुर्भाव सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा वाढताना दिसून आला. सप्टेंबर महिन्याभरात शहर, उपनगरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण केवळ एक टक्क्याने वाढले आहे. तर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, मुंबईत सप्टेंबर महिन्यात ६२ हजार ४२० रुग्ण आढळले आहेत.

सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्क्यांवर केवळ ८२ टक्क्यांवर पोहोचले आहे. मागील महिन्याच्या अखेरीस असणारा गणेशोत्सव आणि अनलॉकची सुरू झालेली प्रक्रिया हे पुन्हा एकदा मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला कारणीभूत ठरत आहे. मुंबईत ४ सप्टेंबर रोजी २२ हजार २२० सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापूर्वी, ३ सप्टेंबर रोजी २१ हजार ४४२, २ सप्टेंबर रोजी २० हजार ८१३ , १ सप्टेंबर रोजी २० हजार ६५ आणि ३१ आॅगस्ट रोजी ही संख्या २० हजार ५५४ इतकी होती. खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची संख्या वाढली आहे.६ सप्टेंबरपर्यंत मुंबईत एकूण एक लाख ५० हजारांहून अधिक रुग्ण नोंदवले गेले असून यातील १ लाख २३ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईत सध्या २६ हजारांहून अधिक सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील जवळपास ८० टक्के रुग्ण लक्षणविरहित असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.चार लाखांहून अधिक मुंबई घरगुती अलगीकरणातलॉकडाऊनच्या सहा महिन्यांनंतरही मुंबईत ४ लाख २० हजार २०५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत. आतापर्यंत ११ लाख १ हजार ७३४ लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून, त्यातील पॉझिटिव्ह चाचण्यांचे प्रमाण हे १८.२२ इतके आहे. मुंबईत आतापर्यंत २५ लाख ६६ हजार ५९० लोकांनी घरगुती अलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे.कठोर नियमआणि दंडात्मक कारवाईअनलॉकचा पुढचा टप्पा सुरू झाला असला तरीही शहर, उपनगरात कठोर नियमही करण्यात आले आहेत. शिवाय, नियम न पाळणाऱ्या मुंबईकरांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या पातळीवर चाचण्यांची क्षमता वाढविणे, खाटांची उपलब्धता आणि रुग्णांची संख्या कमी करणे यासाठी प्रयत्नशील आहे.- सुरेश काकाणी,अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई