अलिबाग : रायगडच्या वाहतूक विभागाने गेल्या तीन दिवसांमध्ये वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या ३६६ व्यक्तींवर कारवाई करीत ८१ हजार ८०० रु पयांचा दंड वसूल केला. जिल्ह्यातील २७ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाहतूक विभागाने ही कारवाई केली आहे. १० नोव्हेंबर रोजी १३१ व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येऊन त्यांच्याकडून २९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे, ११ नोव्हेंबरला १२८ व्यक्तींकडून २६ हजार ७०० रुपयांचा दंड, तर १२ नोव्हेंबरला २५ हजार ६०० रु पयांचा दंड आकारत १-७ व्यक्तींवर कारवाई केली आहे. पुढील आठवड्यात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}