Join us  

उत्पन्न आणि वक्तशीरपणात पश्चिम रेल्वेचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 6:11 AM

जुने विक्रम मोडीत : उत्पन्नातही झाली मोठी वाढ

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाने अनेक जुने विक्रम मोडीत काढून यावर्षी नवीन विक्रम रचले आहेत. विनातिकिट प्रवास करणाऱ्यावर कारवाई, लोकल आणि मेल, एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणा, भंगार विक्री यामध्ये पश्चिम रेल्वेने विक्रम नोंदविला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील चालविण्यात येणाऱ्या लोकल आणि मेल, एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणा ९४.८० टक्के इतका झाला आहे. मागील वर्षी वक्तशीरपणामध्ये ९३.५ टक्के होती. आता वक्तशीरपणामध्ये वाढ झाल्याने एक नवा विक्रम पश्चिम रेल्वेने रचला आहे.तर भारतीय रेल्वेमध्ये पश्चिम रेल्वेने सर्वाधिक रूपयांचे भंगार विकून नवा विक्रम रचला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने ५३७ कोटी रुपयांचे विविध प्रकाराचे भंगार विकले आहे.

मागील ५ वर्षांमध्ये मुंबई विभागाने सर्वात जास्त उत्पन्न कमावले आहे. मुंबई विभागाने आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ३ हजार ५९ कोटी रूपयांचे उत्पन्नांची नोंद झाली आहे. ही नोंद मागील पाच वर्षांमध्ये सर्वाच्च असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षी ७७९ कोटी रूपयांची नोंद झाली होती. तिकीट तपासणी, प्रवाशांच्या तिकिटातून उत्पन्न, माल वाहतूकीतून येणाºया उत्पन्नातून ३ हजार ५९ कोटी उत्पन्न झाले आहे.२६७ पैकी १२४ निविदा अंतिम टप्प्यातपश्चिम रेल्वेने मागील पाच वर्षांत २६७ निविदा जारी केल्या. यात १२४ निविद अंतिम टप्प्यात आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट स्थानकावर प्रोजेक्टर मॅपिंग, वॉटर वेडिंग मशीन, मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘आॅन बोर्ड शॉपिंग’ याची व्यवस्था, पश्चिम रेल्वेच्या ११ स्थानकावर व्हीडीओ वॉल स्क्रीन लावण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये अनुभूती कोचमध्ये ‘लायब्रेरी आॅन व्हील’ सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :रेल्वे