Join us
Daily Top 2Weekly Top 5

मांगाठणेत जर्बेरांंचे विक्रमी उत्पादन

By admin | Updated: April 26, 2015 23:04 IST

दिवसेंदिवस पारंपारिक शेती करणे कठिण झाले आहे. बी-बियाणे, रासायनिक खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्या तूलनेत शेतपिकांना पाहिजे तो

वसंत भोईर, वाडादिवसेंदिवस पारंपारिक शेती करणे कठिण झाले आहे. बी-बियाणे, रासायनिक खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्या तूलनेत शेतपिकांना पाहिजे तो भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अत्याधुनिक शेतीकडे वळला आहे. असाच प्रयोग वाडा तालुक्यात प्रथमच मांगाठणे, गोऱ्हा, दुपारे येथील शेतकऱ्यांनी केला असून त्यांनी जर्बेरा फुलांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात शेंद्रुण, पालघर येथील केळवा-माहिम येथे काही प्रमाणात शेतकरी जर्बेराचे उत्पादन घेत आहेत. या फुलाला मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र येथील शेतकऱ्यांना विक्रीसाठी बाजारपेठ लांब पडत असल्याने वाहतूक खर्च वाढत आहे. मजुरांची कमतरता, खते औषधांचा तुटवडा या गोष्टीमुळे शेतकऱ्यांची गैरसोय होते. मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी जर्बेराचे उत्पादन घेणे सुरु केले आहे.