Join us

दिवसभरात ३४ हजार ३१ कोरोना रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात बुधवारी एकूण ३४ हजार ३१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात बुधवारी एकूण ३४ हजार ३१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५४ लाख ६७ हजार ५३७ झाली आहे. तर, दिवसभरात ५१ हजार ४५७ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण ४९ लाख ७८ हजार ९३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात एकूण ४ लाख १ हजार ६९५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात नव्याने कोरोनाबाधित होणाऱ्यांच्या संख्येचा आलेख उतरणीचा आहे, तर बरे होणाऱ्यांचे प्रमाणही पन्नास हजारांच्या आसपास स्थिर आहे. त्यामुळे मागील आठवड्यात पाच लाख सक्रिय रुग्णांची संख्या आता चार लाखांपर्यंत खाली आली आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.६ टक्के एवढे झाले आहे, तर दिवसभरात ५९४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, आतापर्यंत ८४ हजार ३७१ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी १८ लाख ७४ हजार ३६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४ लाख ६७ हजार ५३७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३० लाख ५९ हजार ९५ व्यक्ती होमक्वाॅरंटाइनमध्ये आहेत, तर २३ हजार ८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत.