Join us  

दोन मोनोची पुनर्बांधणी; ‘आत्मनिर्भर'तेवर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 6:47 PM

Reconstruction mono : एकूण सात मोनोरेल धावणार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर चालविल्या जाणा-या सात मोनोरेलपैकी दोन मोनोरेलची पुनर्बांधणी भारताच करण्यात आली असून, यापैकी धावणा-या सहा मोनोरेलमध्ये आठवड्याभरात आणखी एका मोनोरेलची भर पडणार आहे. परिणामी या मार्गावर एकूण सात मोनोरेल धावणार असून, चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या मार्गावर वाढती प्रवाशांची संख्या पाहता भविष्यात या मार्गावर दोन मोनोरेलमधील अंतर १५ ते १८ मिनिटांवर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

डिसेंबर २०१८ रोजी स्कोमी आणि एल अँड टी कडे मोनोरेलची देखभाल दुरुस्ती असताना मोनो तोटयात होती. केवळ तोटयात नव्हे तर स्कोमी डबघाईला आली होती. एमएमआरडीएसोबत झालेल्या कंत्राटानुसार काम सुरु नव्हते. अपघात होत होते. १० पैकी २ मोनोरेल बाद झाल्या होत्या. १ मोनोरेलला आग लागली होती. एका अर्थाने ३ मोनोरेल बाद झाल्या होत्या. परिणामी डिसेंबर २०१८ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एक धाडसी निर्णय घेतला. या निर्णयानुसार, एमएमआरडीएने मोनोरेलचा ताबा आपल्याकडे घेतला. तेव्हापासून ‘आत्मनिर्भर' तेवर भर देण्यात आला. आणि मोनोरेलची पुनर्बांधणी करताना देशातील स्पेअर पार्टस वापरण्यात आले. किंवा तशा मॅन्योफ्रॅक्चरशी बोलणी सुरु झाली. आयआयटीची मदत घेण्यात आली. त्यानंतर कुठे दोन वर्षांच्या मेहनतीमुळे आज दोन मोनोरेलची पुनर्बांधणी भारतात करण्यात आली असून, यामुळे प्राधिकरणाची वाटचाल  ‘आत्मनिर्भर'तेकडे होत असल्याचा दावा केला जात आहे.

-------------

देशातच बनविलेली मोनोरेल पाहिजे यावर आमचा भर होता. यासाठी देशातच स्पेअर पार्टसवाले मॅन्युफ्रॅक्चर शोधा, असे आम्ही निर्देश दिले होते. त्या दिशेने काम सुरु होते. तेव्हा कुठे दोन वर्षांनंतर आम्ही या टप्प्यावर आलो आहोत. मोनोरेल ही सार्वजनिक परिवहन सेवा असल्याने ती तोटयात आहे का? या पेक्षा तिचा वापर जास्तीत जास्त व्हावा यावर आमचा भर असणार आहे. मोनोरेलचे प्रवासी कसे वाढतील? याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. सोलारासाठी काम सुरु आहे. मोनोरेलच्या खांबावर जाहिरातीसाठी प्रयत्न केले जात आहेत. दोन मोनोमधील अंतर १५ ते १८ मिनिटे करण्यावर भर दिला जात आहे.

- आर.ए. राजीव, महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

------------- 

टॅग्स :मोनो रेल्वेमुंबई