Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान करण्याबाबत शिफारस करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:06 IST

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र विधानमंडळात ठराव संमत करून केंद्र शासनाला शिफारस करण्याची मागणी ...

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र विधानमंडळात ठराव संमत करून केंद्र शासनाला शिफारस करण्याची मागणी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत समस्त भारतीयांच्या मनात असलेला आदर व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान सर्व भारतीयांना ज्ञात आहे. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत आपल्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याबाबतचा ठराव महाराष्ट्र विधानमंडळात विद्यमान सत्रात प्राधान्याने आणून व संमत करून केंद्र शासनाकडे तातडीने पाठविण्यात यावा, विधानमंडळातील सर्व पक्षीय सदस्यांकडून या प्रस्तावास निश्चितच समर्थन मिळेल याबाबत दुमत नाही असेदेखील त्यांनी पत्रात नमूद केले आहे.