Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाच खोऱ्यांच्या जल आराखड्यास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 04:57 IST

राज्यातील महत्त्वपूर्ण कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिनी नद्या व महानदी खो-यांच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य जल परिषदेच्या पाचव्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मुंबई : राज्यातील महत्त्वपूर्ण कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिनी नद्या व महानदी खो-यांच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य जल परिषदेच्या पाचव्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील सर्वच खोºयांच्या एकत्रित एकात्मिक जल आराखड्याचे काम १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या परिषदेच्या बैठकीस परिषदेचे उपाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, उद्योग मंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते. सहा खोºयांचा अभ्यास करून स्वतंत्रपणे जल आराखडे तयार करण्यात आले आहेत. यापैकी गोदावरी खोºयाच्या जल आराखड्यास ३० नोव्हेंबर २०१७ रोजी मान्यता देण्यात आली होती. तर उर्वरित पाच आराखड्याचे सादरीकरण परिषदेच्या बैठकीत करण्यात आले.मुख्यमंत्री म्हणाले, नदी खोºयांचे आराखडे तयार करून ऐतिहासिक काम केले आहे. नदी खोºयांचे आराखडे तयार करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे.>ठळक वैशिष्ट्येसहाही खोºयांतील नद्यांचे जल आराखडे तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्यएकात्मिक राज्य जल आराखड्याच्या १७ जानेवारी २०१५ च्या पहिल्या बैठकीत प्रत्येक खोºयाचा आराखडा तयार करण्यास चालनाजल आराखड्यामध्ये एकूण १९ प्रकरणे समाविष्टउपखोºयांची माहिती, भूपृष्ठीय शैलस्थिती, मृदाची माहिती, नदी खोºयांची संरचना, भूपृष्ठ जल व भूजलची स्थिती, जलसंपत्ती विकास आंतरखोरे पाणी, पाणलोट विकास व व्यवस्थापन, पाण्याचा ताळेबंद, जलस्त्रोताचे व्यवस्थापन, सांडपाणी पुनर्वापर आदी बाबींचा समावेश.