Join us  

मंदीचा फटका ! रोमान्सच्या राजधानीत 8 टक्क्यांनी घटली कंडोमची विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 11:47 AM

विशेष म्हणजे उद्योग क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसला असून कार, दारू आणि अर्जेंटिनातील मटण विक्रीतही मोठी घट झाली आहे.

मंदीचा फटका केवळ ऑटोमोबाईल क्षेत्रालाच बसला नसून इतरही क्षेत्रात मंदीचा परिणाम जाणवत आहे. विशेष म्हणजे केवळ भारतातच नाही, तर अमेरिकेलाही मंदीला सामोरे जावे लागत आहे. दक्षिण अमेरिकेतील रोमान्सची राजधानी असलेल्या अर्जेंटिना येथेही मंदीचा फटका बसल्याचं दिसून येतंय. कारण, अर्जेंटीनामधील कंडोमची विक्री आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीतही घट झाल्याचं औषध कंपन्यांनी म्हटलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलं असून, कंडोमच्या विक्रीत 8 टक्के घट झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. 

देशातील मंदीची झळ मोठ्या प्रमाणात आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जाणवत आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह इतरही राज्यातील अनेक कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांवर मंदीमुळे बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. दक्षिण अमेरिकेची आर्थिक राजधानी आणि कपल्सचे आवडते ठिकाण असलेल्या अर्जेंटिनातही मंदीचा फटका बसला आहे. अर्जेंटिना दक्षिण अमेरिकेची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र अर्जेंटिनाचं चलन पेसोमध्ये डॉलरच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे वर्षाअखेरपर्यंत त्यांची अर्थव्यवस्था 2.6 टक्के घसरण्याची चिन्हे आहेत. अर्जेंटिना आधीच 50 टक्के वार्षिक महागाई दराचा सामना करत आहे. त्यात मंदीमुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. 

विशेष म्हणजे उद्योग क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसला असून कार, दारू आणि अर्जेंटिनातील मटण विक्रीतही मोठी घट झाली आहे. तर, कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचीही विक्री घटली आहे. “अर्जेंटिनामध्ये कंडोम निर्मितीचं साहित्य आयात होतं. आता देशाचं चलन ढासळल्यामुळे आयातीला फटका बसला आहे. शिवाय गर्भनिरोधक गोळ्यांचीही विक्री घटली आहे. देशातील जवळपास 1 लाख 44 हजार महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या घेणं बंद केलं आहे”, असे ट्यूलिपन आणि जेंटलमेन या कंडोम ब्रँडची निर्मिती करणारी कंपनी कोपेल्कोचे अध्यक्ष फिलिप कोपेलोवित्स यांनी सांगितलंय.  

टॅग्स :अमेरिकामुंबईअर्थव्यवस्था