Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या विद्यार्थ्यांचे पाण्यासाठी हाल

By admin | Updated: April 2, 2016 02:30 IST

विक्रोळी येथे शाळा बांधून देताना विकासकाने पाण्याची व्यवस्था केलेली नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना गेली सहा वर्षे टँकरच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे़ यासाठी जबाबदार

मुंबई : विक्रोळी येथे शाळा बांधून देताना विकासकाने पाण्याची व्यवस्था केलेली नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना गेली सहा वर्षे टँकरच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे़ यासाठी जबाबदार संबंधित विकासकावर कारवाई करण्याची मागणी शिक्षण समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे़ वर्षानगर येथे पालिका शाळेचे बांधकाम करणाऱ्या विकासकाला टीडीआरच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांसाठी पाण्याची टाकी बांधून देण्याची अट घालण्यात आली होती़ ही अट विकासकाने मान्यही केली़ प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्याची कोणती व्यवस्था नसल्याने दीड हजार विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत़ नगरसेवक शिवनाथ दराडे यांनी या प्रकरणी हरकतीचा मुद्दा उपस्थित करूनविकासकाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी़ त्याला दिलेल्या टीडीआरवर २ टक्के दंड वसूल करावा, अशी मागणी केली़ याची दखल घेण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष रितू तावडे यांनी दिले़ (प्रतिनिधी)