Join us
Daily Top 2Weekly Top 5

माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्याविरोधात पक्षातून बंडखोरी

By admin | Updated: February 4, 2017 07:22 IST

शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्याविरोधात शिवसेनेतून बंडखोरी करण्यात आली आहे. श्रद्धा जाधव यांना अँटॉप हिलऐवजी भोईवाड्यातील प्रभाग क्रमांक २०२ मधून

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 04 - शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्याविरोधात शिवसेनेतून बंडखोरी करण्यात आली आहे. श्रद्धा जाधव यांना अँटॉप हिलऐवजी भोईवाड्यातील प्रभाग क्रमांक २०२ मधून उमेदवारी दिल्याने येथील स्थानिक शिवसैनिक नाराज झाले आहेत. 
श्रद्धा जाधव यांच्याविरोधात या प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक नंदकिशोर विचारे यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंड पुकारले आहे. तसेच, त्यांच्या विरोधात मिरा निंबाळकर, साधना राऊळ आणि तृप्ती मोरे या तीन महिला शिवसैनिकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीला भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म घेवून शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या श्रद्धा जाधव यांना उमेदवारी का देण्यात आली, असा सवाल नंदकिशोर विचारे यांनी केला आहे.