Join us

बलात्कारप्रकरणी हास्य अभिनेता रेहमान खानला १४ दिवस कोठडी

By admin | Updated: March 11, 2016 02:17 IST

एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी हिंदी हास्य अभिनेता रेहमान खानला वालीव पोलिसांनी काल रात्री उशिरा कुर्ला येथून अटक केली. त्याला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वसई : एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी हिंदी हास्य अभिनेता रेहमान खानला वालीव पोलिसांनी काल रात्री उशिरा कुर्ला येथून अटक केली. त्याला १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सांताकु्रझ येथे राहणाऱ्या तीस वर्षीय पिडीत महिलेची रेहमानशी सोशल नेटवर्कींगवरून ओळख झाली होती. तिचे पती आखाती देशात नोकरी करीत असून ती रेहमानची फॅन असल्याने त्यांची लगेचच मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर रेहमानने तिच्याकडून दोन लाख रुपये उसणे घेतले होते. पैशासाठी तिने तगादा लावल्यानंतर रेहमानने तिला पैसे देण्याच्या बहाण्याने मुंबई-अहमदाबाद हायवेवर ससुनवघर येथील सुवी पॅलेस हॉटेलमध्ये बोलावले होते. त्याठिकाणी रेहमानने तिच्यावर बलात्कार करून मारहाणही केली. तसेच तिचे अश्लिल फोटो प्रसारीत करण्याची धमकी देऊन अनेकवेळा बलात्कार केला होता. याप्रकरणी महिलेने सांताक्रुझ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (प्रतिनिधी)