हेवा वाटेल असे अंधेरी करणारअंधेरी पूर्वेसाठी कोणत्या पायाभूत सुविधा उभारण्याचे आपले नियोजन आहे? - या विभागात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न आहे़ त्यावर तोडगा म्हणजे रस्ते रुंद करण्याचे काम युद्धपातळीवर करण्याला यापुढील काळात प्राधान्य दिले जाईल़ वाहतुकीच्या मार्गिकेमध्ये बदलांसह विविध पर्यायांचा विचार केला जाईल़ त्याचबरोबर पादचाऱ्यांना त्रास होणार नाही, असे पदपथ निर्माण करण्याचा मानस आहे़ तसेच घराघरात वीज व पाणी देण्यासाठी विविध योजना येथे आणण्यावर जोर दिला जाईल़ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी आपल्या काय योजना आहेत? - ज्येष्ठ नागरिकांना हक्काने मनमोकळेपणाने फिरता येईल, जेथे त्यांना विरंगुळा वाटेल, असे भव्य उद्यान उभारण्याचा मानस आहे़ महत्त्वाचे म्हणजे म्युझिकल फाउंटन हे प्रथमच अंधेरीत उभारले गेले़ तसेच या भव्य उद्यानात आणखी वेगळेपण आणण्याचा मानस आहे. तसेच या उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी अद्ययावत खेळणी ठेवण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. अंधेरी परिसरात शिक्षण अधिक सक्षम, सकस करण्याबाबत आपले धोरण काय आहे? - या विभागात अधिक दर्जेदार शिक्षण उपलब्ध करण्याचा माझा मानस आहे़ राज्य सरकारच्या पातळीवर नवनवीन योजना राबवून या विभागातील शाळांना सक्षम पायाभूत सुविधा देण्याचा विचार आहे़ शिक्षणाच्या माध्यमातून युवकांचे सशक्तीकरण शक्य असल्याने पुढच्या काळात शिक्षणावर माझा अधिक भर असणार, याची मी ग्वाही देतो. युवकांना कृतिशील करण्यासाठी तुम्ही आगामी काळात कोणत्या योजनांसाठी आग्रही राहाल? - अंधेरी पूर्वेतील युवकांसाठी प्रथम विविध रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे़ तसेच येथील युवकांना विविध क्रीडा प्रकारांचा सराव करून देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करता यावी, यासाठी दर्जेदार क्रीडा संकुल उभारण्यावर भर देणार आहे. विभागातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आपण कसा मार्गी लावाल? - प्रत्येक झोपडपट्टीचे प्रश्न वेगवेगळे आहेत़ मात्र सर्वांचा विचार करून कोणाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल़ तसेच आता असलेल्या झोपडपट्टींना पायाभूत सुविधा देण्याला प्राधान्य दिले जाईल़
उमेदवारीस कारण की....
By admin | Updated: October 13, 2014 04:08 IST