मुंबई : कृत्रिम पाऊस पाडण्याचे पालिकेचे प्रयोग आतापर्यंत फेल गेले़ मात्र पाण्यासाठी विहिरींची सफाई आणि कूपनलिकांच्या दुरुस्तीऐवजी प्रशासन पुन्हा एकदा खोटा पाऊस पाडण्याच्या प्रयत्नात आहे़ परंतु अशा प्रयोगाची शाश्वती नसल्याने करोडो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे़ या वर्षी कमी पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याने केले़ मात्र पाणीपुरवठा करणार्या तलावांमध्ये १७ जुलैपर्यंतचा साठा असल्याने मुंबईला टेन्शन नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले़ तरीही खबरदारी म्हणून पालिकेने जलस्रोतासाठी आणखी कोणते मार्ग शोधले, याबाबत माहिती देण्याची मागणी नगरसेवकांनी पालिकेच्या महासभेत आज केली़ कूपनलिका बांधण्यासाठी नगरसेवक निधी वापरण्याची परवानगी मिळाली़ मात्र देखभाल व सफाईअभावी अनेक कूपनलिका बंद पडल्या आहेत़ सक्तीचा करण्यात आलेला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पही फेल गेल्याचा संताप नगरसेवकांनी व्यक्त केला़ तसेच कूपनलिकेच्या सफाईसाठी निधी असावा, अशी सूचना अनेकांनी केली़ (प्रतिनिधी)
पाच वर्षांचा प्रयोग कृत्रिम पावसाचे प्रयोग प्रत्येक पावसाळ्यात करून पाहण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी पालिकेने घेतला़ मात्र हवेची दिशा व वेग आणि पावसाचे पाणी वाहून नेण्याची ढगांची क्षमता याचा अभ्यास केल्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा मुहूर्त हवामान खाते पालिकेला कळविणार आहे़ यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़ च्रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामुळे पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी पाणीसाठा उपलब्ध होईल, असा पालिकेचा दावा होता़ च्नवीन इमारतींना हा प्रकल्प सक्तीचा करण्यात आला, तरी किती ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जाते? याची पालिकेकडे माहिती नाही, अशी नाराजी नगरसेवकांनी व्यक्त केली़
च्याची गंभीर दखल घेऊन या प्रकल्पांतर्गत किती इमारतींना परवानगी दिली, यावर श्वेतपत्रिका सादर करण्याचे आदेश महापौर सुनील प्रभू यांनी दिले़ च्कूपनलिकांच्या सफाईसाठी फंड असावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली़ मात्र पालिकेचा २०१४-२०१५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यामुळे यासाठी आता वेगळी तरतूद करणे शक्य नाही, असे स्पष्ट करीत अतिरिक्त आयुक्त एस़व्ही़ श्रीनिवास यांनी नकारघंटा वाजवली़
च्२००९ मध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे पालिकेने मॅकोरोनी या कंपनीला पारंपरिक पद्धतीने कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी १५ लाख रुपये तर अग्नी एव्हिएशनला रासायनिक पद्धतीकरिता आठ कोटी दिले होते़ च्मात्र हे प्रयोग फेल गेले आणि पालिकेचे पैसे बुडाले़ विमान व रडार सदोष असल्यामुळे १६० वेळा केलेले प्रयोग फेल गेल्याचा निष्कर्ष त्या वेळेस काढण्यात आला होता़