Join us
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक यंत्रणा सज्ज

By admin | Updated: October 12, 2014 22:58 IST

निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीचा धुरळा सोमवारी (ता.१३) सायंकाळी खाली बसल्यानंतर १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

आविष्कार देसाई, अलिबागनिवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीचा धुरळा सोमवारी (ता.१३) सायंकाळी खाली बसल्यानंतर १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.महसूल विभागातील १२ हजार १०५ अधिकारी, कर्मचारी मतदान प्रक्रियेच्या कामात व्यस्त राहणार आहेत, तसेच पोलीस प्रशासनातील तीन हजार २९४ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सहा कंपन्या तैनात करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक यंत्रणेतील सूत्रांनी दिली.सातही विधानसभा मतदार संघातील दोन हजार ५०६ मतदान केंद्रावर दोन हजार ४८८ तसेच ३२५ राखीव अशा एकूण दोन हजार ८१३ मतदान यंत्रासह कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी २९१ बस, ७१ मिनी बस, ५४४ जीप अशा एकूण ९०६ वाहनांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे.पनवेल विधानसभा मतदार संघासाठी आवश्यक असलेल्या मतपेट्या या पनवेल येथील धाकटा खांदा अब्दुल रझ्झाक कळसेकर तंत्रविद्यालयातून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे कर्जत- कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, दहीवली, कर्जत, उरण- सिडको व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, उरण, पेण- के.ई.एस. लिटील एंजल इंग्लीश स्कूल, पेण, अलिबाग-जे.एस.एम कॉलेज, अलिबाग, श्रीवर्धन- न्यू इंग्लीश स्कूल म्हसळा, महाड- डॉ.बाबासाहेब राष्ट्रीय स्मारक, महाड.