Join us

रंगले ‘व्हिजन’चे कथा अभिवाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:06 IST

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘व्हिजन’ संचालित ‘चला, वाचू या’ उपक्रमाच्या मासिक अभिवाचनाचे ७२ वे पुष्प गुंफताना या संस्थेने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘व्हिजन’ संचालित ‘चला, वाचू या’ उपक्रमाच्या मासिक अभिवाचनाचे ७२ वे पुष्प गुंफताना या संस्थेने अनोखा कार्यक्रम घडवून आणला. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून लेखकांच्या आगामी कथासंग्रहातल्या कथांच्या अभिवाचनाचा उपक्रम यावेळी पार पडला. ‘व्हिजन’च्या यूट्यूब चॅनेलवर आयोजित या कार्यक्रमात ‘पॉप्युलर प्रकाशन’चे रामदास भटकळ, लेखिका आणि ‘मौज प्रकाशन’च्या संपादिका मोनिका गजेन्द्रगडकर व चित्रपट समीक्षक गणेश मतकरी हे सहभागी झाले होते.

अनुवाद आणि एकूणच अनुवादित साहित्याविषयी बोलताना रामदास भटकळ यांनी यावेळी विविध मुद्द्यांना स्पर्श करत विवेचन केले. मोनिका गजेन्द्रगडकर यांनी त्यांच्या आगामी ‘त्रिपर्ण’ या संग्रहातील ‘फ्लेमिंगो’ या कथेचे यावेळी वाचन केले. तर गणेश मतकरी यांनी त्यांच्या आगामी ‘बटरफ्लाय इफेक्ट’ या कथासंग्रहातील ‘जगबुडी’ या कथेचे वाचन केले. २३ एप्रिल, जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आयोजित हे पुष्प नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे अधिकच बहारदार झाले, अशा भावना ‘व्हिजन’चे रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांनी मांडल्या.

-----------------------------------------------------------------------------------------------