Join us
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत वायूगळती

By admin | Updated: May 17, 2015 01:34 IST

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लिटमस आॅरगॅनिक प्रा. लि. या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी वायूगळती होऊन चाळकेवाडीतील नऊ तरुणांना बाधा झाली.

आवाशी (जि. रत्नागिरी) : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लिटमस आॅरगॅनिक प्रा. लि. या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी वायूगळती होऊन चाळकेवाडीतील नऊ तरुणांना बाधा झाली. सुदैवाने कोणालाही रुग्णालयात नेण्याची वेळ आली नाही.अ‍ॅक्मे रसायनाचे उत्पादन घेणारी लिटमस आॅरगॅनिक कंपनी मागील दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत आहे. शुक्रवारी मधल्या पाळीत उत्पादनाचे काम सुरू असताना एफबीडीच्या ट्रायरचे तापमान वाढल्याने तो फाटून वायू परिसरात सर्वत्र पसरला. ही घटना सायंकाळी सहा वाजता घडली.त्यानंतर शेजारील मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या नऊ तरुणांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती दिल्यावर क्षेत्रीय अधिकारी व्ही. जी. भताणे व अभिजित कसबे यांनी कंपनीत भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. मात्र, कुणीही अधिकारी उपलब्ध न झाल्याने कंपनीवर कारणे दाखवा अथवा बंदची कारवाई होण्याचे संकेत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिले.