Join us
Daily Top 2Weekly Top 5

...त्यापेक्षा तुम्ही जिथे असाल त्या गावी सुखी राहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:06 IST

महाराष्ट्र पोलीस; विनाकारण फिरण्याचे प्लॅन बनवणाऱ्या ‘वल्लींना’ आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात कडक निर्बंध ...

महाराष्ट्र पोलीस; विनाकारण फिरण्याचे प्लॅन बनवणाऱ्या ‘वल्लींना’ आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात कडक निर्बंध आहेत. संसर्ग नियंत्रणासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. जनजागृतीसाठी महाराष्ट्र, मुंबई पोलीसही वेवगेगळे ट्विट करत आहेत. शुक्रवाऱी महाराष्ट्र पोलिसांनी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजेच पु.ल. देशपांडे यांच्या भाषणातील एक क्लिप ट्विट केली आहे. त्यात ‘...त्यापेक्षा तुम्ही जिथे असाल त्या गावी सुखी राहा, आयुष्यात सगळ्याच महत्त्वाकांक्षा काही पुऱ्या होत नाहीत’, असे वाक्य आहे.

लॉकडाऊनच्या काळात आवश्यकता नसताना बाहेरगावी फिरण्याचे प्लॅन बनवणाऱ्या ‘वल्लींना’, जबाबदार नागरिक हेच म्हणतात म्हणत, पु. ल. देशपांडे यांच्या भाषणातील क्लिप पाेलिसांनी ट्विट केली आहे. काेराेना संसर्ग राेखण्यासाठी आहात तेथेच रहा, विनाकारण फिरू नका, असा संदेश याद्वारे देण्यात आला आहे. याशिवाय पाेलिसांनी ट्विटरवर टॉम ॲण्ड जेरी या लोकप्रिय कार्टूनचा व्हिडिओ शेअर केला आहे. ट्विटमध्ये, ‘कार्टूनमध्ये टॉमपासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वांना बाहेर पळावे लागते, पण खऱ्या आयुष्यात आपल्याला कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी पळायचे आहे’, असे नमूद करण्यात आले आहेत.

अशाच प्रकारे चित्रपटातील डायलॉग, वर्तमानातील घडामोडी, गेम्ससह विविध विषयांचा धागा पकडून पाेलिसांनी काेराेनासंदर्भात केलेल्या जनजागृतीपर ट्विटचे नेटिझन्सनकडून कौतुक होताना दिसत आहे.

......................................