Join us

रतन टाटांचे ट्वीटर अकाउंट हॅक

By admin | Updated: September 11, 2016 11:26 IST

उद्योगपती रतन टाटा यांचे ट्वीटर अकाउंट हॅक करण्यात आले होते, याबाबतचा खुलासा खुद्द रतन टाटा यांनी ट्विटरवरच केला आहे.

-ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली,दि.11- उद्योगपती रतन टाटा यांचे ट्वीटर अकाउंट हॅक करण्यात आले होते, याबाबतचा खुलासा खुद्द रतन टाटा यांनी ट्विटरवरच केला आहे.  

टाटा यांच्या अकाउंटवरून शनिवारी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे एकत्र छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते. त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियामध्ये चांगलाच गदारोळ उडाला होता. 
 
याबाबत खुलासा करताना टाटा म्हणाले , 'ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे पाहून मला धक्का बसला , त्यावर जाणीवपूर्वक चुकीचे ट्विट करण्यात करण्यात आले होते. ते ट्विट आता काढून टाकण्यात आले आहे. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो'. 
 
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांचेही ट्‌विटर अकाउंट शनिवारी हॅक झाले होते.