Join us
Daily Top 2Weekly Top 5

सातबंगला बस आगार कॅन्टीनमध्ये उंदरांचे साम्राज्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:34 IST

मुंबई : वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या सातबंगला बस आगार कॅन्टीनमध्ये उंदरांचे साम्राज्य आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ...

मुंबई : वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या सातबंगला बस आगार कॅन्टीनमध्ये उंदरांचे साम्राज्य आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बस आगारातून विविध ठिकाणी अनेक बससेवा उपलब्ध असून कर्मचारी जेवण्यासाठी कॅन्टीनमध्ये आले असताना त्यांना उंदरांचा सामना करावा लागतो. एकीकडे कोविडचा सामना करायचा आणि दुसरीकडे येथे असलेला उंदरांचा सुळसुळाट यामुळे येथील कर्मचारी हैराण झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच बेस्ट नियंत्रण कक्षाचे उद्घाटन केले. बेस्टचे आधुनिकीकरण करण्याची त्यांनी घोषणा केली. आता येथील उंदरांचे साम्राज्य नष्ट करण्याचे आदेश त्यांनी बेस्ट प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी बेस्ट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नितीन भाऊराव पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर जारी केला आहे.

---------------------------------------------