Join us

पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ रासपची निदर्शने

By admin | Updated: June 30, 2015 01:28 IST

तथाकथित चिक्की घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेल्या महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय समाज पक्षाने चेंबूरमध्ये जोरदार निदर्शने केली.

मुंबई : तथाकथित चिक्की घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेल्या महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय समाज पक्षाने चेंबूरमध्ये जोरदार निदर्शने केली. पंकजा यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसकडून झाला. काँग्रेसने तशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. मात्र हे आरोप बिनबुडाचे आहेत, असा दावा आंदोलनात सहभागी झालेले रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला. पंकजा यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन, अशी प्रतिज्ञाही जानकर यांनी या वेळी केली. याआधी पंकजा यांनीही आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन, असा दावा केला होता. (प्रतिनिधी)