Join us  

"रश्मी शुक्ला अनेक आमदारांच्या संपर्कात, त्यांचा सीडीआर तपासा"; हसन मुश्रीफ यांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 5:14 PM

Hasan Mushrif: फोन टॅपिंग प्रकरणी आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

Hasan Mushrif: फोन टॅपिंग प्रकरणी आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी खळबळजनक आरोप केला आहे. "रश्मी शुक्लांच्या चौकशीसोबतच सत्ता स्थापनेच्या काळात त्या अनेक आमदारांच्या संपर्कात होत्या. त्यामुळे त्याकाळातला त्यांचा सीडीआर तपासून पाहावा", अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे. 

"राज्यात सत्ता स्थापनेच्या काळात २४ ऑक्टोबर २०१९ ते २४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत सरकार स्थापनेच्या पूर्वसंध्येपर्यंत रश्मी शुक्ला अपक्ष आमदारांच्या संपर्कात होत्या. अपक्ष आमदार राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी दिली. कोट्यवधी रुपयांची ऑफर अपक्ष आमदारांना भाजपला पाठिंबा द्यावा, यासाठी शुक्ला ऑफर देत होत्या. त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे हे कृत्य चुकीचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी", अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे. 

सत्ता गेल्यामुळे भाजपचा थयथयाट"अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक ठेवणं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी फडणवीस संधी शोधत आहेत. एटीएसनं तपास केला असता तर दोन दिवसात मनसुख हिरेन प्रकरणातील खरे आरोपी समोर आले असते", असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला. राज्यात सत्ता गेल्यामुळे भाजपचा फक्त थयथटात सुरू आहे. पण ते स्वत:चं महाराष्ट्राच्या जनतेसमोर हसं करून घेत आहेत, असंही हसन मुश्रीफ म्हणाले. राज्यात असले खोटे आरोप करुन राज्याची बदनामी केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची माफी मागायला हवी, असंही मुश्रीफ म्हणाले.  

टॅग्स :हसन मुश्रीफरश्मी शुक्लापरम बीर सिंगदेवेंद्र फडणवीस