Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने केला बलात्कार

By admin | Updated: November 4, 2015 23:01 IST

नोकरीला लावण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला लॉजवर नेवून बलात्कार करणाऱ्याला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हद्दपारीची कारवाई

नवी मुंबई : नोकरीला लावण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला लॉजवर नेवून बलात्कार करणाऱ्याला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हद्दपारीची कारवाई झालेली आहे. ऐरोली येथील १५ वर्षीय मुलीला माइंडस्पेस कंपनीत नोकरीला लावण्याच्या बहाण्याने वाशीतील लॉजवर नेवून बलात्कार झाल्याची घटना २४ आॅक्टोबरला घडली होती. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी फरार तरुणाचा शोध घेवून रबाळे पोलिसांनी त्याला तुर्भे स्टोअर येथून अटक केली आहे. विजय बनसोडे (२७) असे त्याचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल असून त्याला हद्दपार करण्यात आले आहे. यानंतरही तो परिसरात वावरत होता. पीडित तरुणी परिचयाची असल्याचे त्याचे म्हणणे असून मर्जीनेच तिच्यासोबत लॉजवर गेलो असेही त्याने पोलिसांना सांगितले. पाणी पिण्याच्या बहाण्याने तो पीडित मुलगी राहत असलेल्या परिसरात गेला होता. तिथे काही महिला व मुलींची भेट झाल्यानंतर स्वत:ची ओळख माइंडस्पेस कंपनीत असल्याचे सांगून नोकरीसाठी मुली व महिला पाहिजे असल्याचे सांगितले. यानुसार पीडित अल्पवयीन मुलगी, तिची मैत्रीण व काही महिला त्याच्यासोबत आल्या होत्या. यावेळी महिलांना कंपनीच्या गेटसमोर उभे करुन पीडित मुलीला व तिच्या मैत्रिणीला कागदपत्रे बनवण्याच्या बहाण्याने रिक्षाने वाशीला घेवून आला. मात्र वाशीत आल्यानंतर मैत्रिणीला एका ठिकाणी थांबवून पीडित मुलीला लॉजवर घेवून गेलेला. तिथे गुंगीचे औषध देवून त्याने बलात्कार केल्याची तक्रार मुलीने दिली आहे. यानंतर तो मुलीचा मोबाइल व मैत्रिणीचे सोन्याचे दागिने घेवून फरार झाला होता. (प्रतिनिधी)