Join us

चेंबूर येथे तरुणीवर बलात्कार

By admin | Updated: May 11, 2014 23:08 IST

लग्नाचे अमिष दाखवत चेंबूर येथे एका २२ वर्षीय तरुणीवर चार वर्षे बलात्कार केल्याच्या आरोपावरून आरसीएफ पोलिसांनी हेमंत पाटील (२८) या आरोपीला आज अटक केली.आरसीएफ कॉलनी परिसरात असलेल्या वाशी गावात ही पिडीत तरुणी तिच्या कुटुंबीयांसोबत राहते.

मुंबई: लग्नाचे अमिष दाखवत चेंबूर येथे एका २२ वर्षीय तरुणीवर चार वर्षे बलात्कार केल्याच्या आरोपावरून आरसीएफ पोलिसांनी हेमंत पाटील (२८) या आरोपीला आज अटक केली.आरसीएफ कॉलनी परिसरात असलेल्या वाशी गावात ही पिडीत तरुणी तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. २०१० मध्ये याच परिसरात राहणार्‍या आरोपी हेंमतसोबत तिची ओळख झाली होती. काही दिवसातच या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबधात झाल्यावर आरोपीने तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत अनेकदा तिच्यावर बलात्कार केले. प्रेमसंबधाला चार वर्ष झाल्यानंतरही आरोपी लग्नाबाबत काहीच बोलत नसल्याने तरूणीने अनेकदा त्याला लग्नाबद्दल विचारले. मात्र प्रत्येकवेळी आरोपी तरुणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता. अखेर दोन दिवसांपुर्वी पुन्हा या तरुणीने त्याला लग्नाबाबत विचारले असता त्याने लग्नाला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तरुणीने आरसीएफ पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.