मुंबई : घराबाहेर खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या चिमुरडीवर २१ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना रविवारी घाटकोपरमध्ये घडली. रमेश जयस्वाल असे आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपर पश्चिमेकडील आंबेडकर नगर परिसरात अडीच वर्षीय चिनू (नाव बदललेले आहे) कुटुंबीयांसोबत राहते. रविवारी रात्री घराबाहेर खेळत असताना, याच ठिकाणी रहात असलेल्या जयस्वालची तिच्यावर नजर गेली. त्याने तिला त्याच्या घरात आणले आणि लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला घराबाहेर सोडले. चिनू त्रास होऊन रडू लागल्याने आईने विचारले असता, तिने खुणेने जखम झालेले ठिकाण दाखविले, त्यानंतर तिच्या पालकांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेत, त्या संदर्भात तक्रार दिली. पोलिसांनी जयस्वालला अटक केली असून, त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातर्गत (पास्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो किरकोळ बिगारी कामे करून उदर्निवाह करत होता, असे घाटकोपर पोलिसांनी सांगितले.
अडीच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार
By admin | Updated: December 1, 2015 04:02 IST