मुंबई : घरात एकाकी असलेल्या 3क्वर्षीय गतिमंद तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये घडली आहे. या प्रकरणी टिळक पोलिसांनी शाहबाज खान (वय 30) या संशयित आरोपीला अटक केली आहे. संबंधित तरुणी पालकांसह चेंबूरमधील एका झोपडपट्टीत वास्तव्यास आहे.
तिचे आई-वडील नातेवाइकांकडे गेले होते. त्यामुळे ती एकटीच घरात होती. ही संधी साधत येथे राहणारा खान तरुणीच्या घरात शिरला. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू केले. त्याच दरम्यान बाहेर गेलेले आईवडील घरी परतले. त्यांनी दरवाजा ठोठावल्याने खान घाबरला. त्याने दोघांना धक्काबुक्की करून तेथून पळ काढला. त्यानंतर पालकांनी या तरुणीला सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर टिळकनगर पोलीस ठाणो गाठून घडला प्रकार तेथील अधिका:यांना सांगितला. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून खानला अटक केली. (प्रतिनिधी)