Join us

मामांकडून गतिमंद मुलीवर बलात्कार

By admin | Updated: November 17, 2016 06:21 IST

गेल्या वर्षभरापासून एका १५ वर्षीय गतिमंद मुलीवर तिच्या दोन सख्ख्या मामांकडून लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोवंडी शिवाजीनगर

मुंबई : गेल्या वर्षभरापासून एका १५ वर्षीय गतिमंद मुलीवर तिच्या दोन सख्ख्या मामांकडून लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोवंडी शिवाजीनगर येथे समोर आली आहे. एका संस्थेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. गोवंडीच्या बैंगनवाडी परिसरात ही पीडित मुलगी आई आणि या दोन मामांकडे राहत होती. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून तिचे दोन्ही मामा मुलीच्या गतिमंदतेचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. एका संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ही बाब मुलीने तेथील एका महिलेला सांगितली. तिने या घटनेची दखल घेत तत्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले. (प्रतिनिधी)