मुंबई : आपल्या 14वर्षीय बहिणीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गुरुवारी भांडुप येथे अटक करण्यात आलेला आरोपी संतोष इंगळे (26) याची 16 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषच्या व्यसनाधीनतेला कंटाळून वर्षभरापूर्वी त्याची प}ी दोन मुलींना घेऊन माहेरी निघून गेली होती. अशात तक्रारदार 14वर्षीय मुलगी भावासोबत एकटीच राहत होती. 4 ऑगस्टला सकाळी ही मुलगी झोपली असताना या आरोपीने तिच्या तोंडाला रुमाल बांधून तिच्यावर बलात्कार केला.(प्रतिनिधी)