Join us
Daily Top 2Weekly Top 5

रुपयाचे आमिष दाखवून बलात्कार

By admin | Updated: December 24, 2015 02:11 IST

एक रुपया देण्याचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या नराधमाने पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे

मुंबई : एक रुपया देण्याचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या नराधमाने पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. याप्रकरणी अशोक चंद्रकांत चाळके (५३) या विकृताला पॉस्को व बलात्काराच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली. पवई परिसरात पाच वर्षीय चिमुकली कुटुंबीयांसोबत राहते. सोमवारी रात्रीच्या सुमारास घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकलीवर चाळकेची नजर पडली. तिला खाऊसाठी एक रुपया देण्याचे आमिष दाखवून तिला घरी नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. तिला विश्वासात घेऊन कुटुंबीयांनी केलेल्या चौकशीत तिने घडलेला प्रकार सांगितला. रात्री उशिरा त्यांनी पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. तसेच चाळकेला अटक करण्यासाठी पवईकरांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. त्यानंतर गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेला चाळकेला पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)