अमर मोहिते - मुंबई
बारामतीमध्ये एका तरूणाविरोधात राजकीय दबावाने बलात्काराची तक्रार नोंदवण्यात आल्याचा धक्कादायक निष्कर्ष नोंदवत उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालकांना या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत़
येथील एक मुलीचा गेल्या वर्षी स्टोव्हच्या आगीने जळून मृत्यू झाला़ प्रथम तिने या घटेनसाठी आपण स्वत: जबाबदार आहोत, असा जबाब पोलिसांना दिला होता़ मात्र बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक जय पाटील यांनी पोलिसांना पत्र लिहिले व या घटनेसाठी सुरेंद्र काजळे जबाबदार असल्याचा दावा केला़ काजळेने पीडित मुलीवर अत्याचार केला व तिला धमकावल़े या भीतीने मुलीने स्वत:ला जाळून घेतले, असे पाटील यांनी पत्रत नमूद केल़े याची दखल घेत पोलिसांनी काजळेविरोधात गुन्हा नोंदवला़ या पत्रनंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला़ त्यात तिने काजळेमुळेच आपण जाळून घेतल्याचे पोलिसांना सांगितल़े
मात्र पोलिसांनी नगरसेवक पाटील यांच्या दाव्याची शहानिशा करणो आवश्यक होत़े तसे न करता पोलिसांनी काजळेविरोधात गुन्हा नोंदवला़ काजळेविरोधात बनावट पुरावे गोळा केल़े हे सर्व बघता हे प्रकरण राजकीय हेतूने रंगवण्यात आले आह़े राजकीय प्रसिद्धीसाठी हे सर्व करण्यात आल़े हे गैर असून पोलीस महासंचालकांनी याची चौकशी करणो आवश्यक आहे, असे मत नोंदवत न्या़ साधना जाधव यांनी याची चौकशी करून त्याचा चार आठवडय़ात अहवाल सादर करण्याचे आदेशही पोलीस महासंचालकांना दिल़े या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी काजळे याने अर्ज केला होता़ त्यावरील सुनावणी अॅड़ प्रशांत हगरे यांनी नगरसेवक पाटील यांचे पत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणल़े त्याची दखल घेत न्यायालयाने हा गुन्हा राजकीय हेतूने नोंदवण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवल़े तसेच काजळेला पंधरा हजार रूपयांचा जामीनही मंजूर केला़
च्पोलिसांनी नगरसेवक जय पाटील यांच्या दाव्याची शहानिशा करणो आवश्यक होत़े परंतु पोलिसांनी सुरेंद्र काजळेविरोधात गुन्हा नोंदवला़ त्यामुळे या प्रकरणात राजकीय हेतू असल्याचे दिसते.