Join us

सुनेच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार

By admin | Updated: May 22, 2015 22:55 IST

सर्वसाधारणपणे सासरा आणि सून हे नाते पिता-कन्येसारखे असते. परंतु आपल्याच सुनेच्या १७ वर्षीय अल्पवयीन बहिणीस पळवून नेऊन, आठवडाभर विविध ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला.

अलिबाग : सर्वसाधारणपणे सासरा आणि सून हे नाते पिता-कन्येसारखे असते. परंतु आपल्याच सुनेच्या १७ वर्षीय अल्पवयीन बहिणीस पळवून नेऊन, आठवडाभर विविध ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. अखेर मुंबईतील धारावी परिसरातील एका मंदिरात तिच्याबरोबर बळजबरीने विवाह करणाऱ्या माणगांव तालुक्यातील निवी-मुठवली गावातील रहिवासी गजानन रामजी जाधव (४४) यास माणगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.पीडित अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, तिला लग्नाचे आमिष दाखवून, गजानन जाधव याने तिला तिच्या गावातील घरातून गेल्या १४ मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पळवून नेले. १५ ते २१ मे या कालावधीत तिच्यावर तिच्या गावात आणि मुंबईत सायन व धारावी येथे बलात्कार केला. अखेर तिच्याबरोबर धारावीमधील एका मंदिरात लग्न केले. पीडित मुलीच्या वडिलांना आपली मुलगी हरवल्यासंदर्भात माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत असताना ही अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार माणगाव पोलिसांनी लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून, गजानन रामजी जाधव यास अटक केली आहे. (विशेष प्रतिनिधी)