Join us

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, ‘इन्स्टाग्राम’ची मैत्री पडली महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 02:43 IST

‘इन्स्टाग्राम’वर मैत्री करत अल्पवयीन मुलीला भेटून गांजा पाजत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीमध्ये घडला होता. या प्रकरणी डी.एन.नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर क्राइम ब्रांचच्या कक्ष ९ ने आदित्य जगदिशचंद्र गुप्ता (२०) या तरुणाला बुधवारी अटक केली आहे.

मुंबई : ‘इन्स्टाग्राम’वर मैत्री करत अल्पवयीन मुलीला भेटून गांजा पाजत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीमध्ये घडला होता. या प्रकरणी डी.एन.नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर क्राइम ब्रांचच्या कक्ष ९ ने आदित्य जगदिशचंद्र गुप्ता (२०) या तरुणाला बुधवारी अटक केली आहे. त्याने एका नामांकित चॅनेलवरील रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.लीना (नावात बदल) या १७ वर्षांच्या मुलीची मैत्री गुप्ताशी ‘इन्स्टाग्राम’वर झाली. काही दिवस चॅटिंग केल्यावर त्याने लीनाला भेटायला अंधेरीच्या एका हॉटेलमध्ये बोलावले. गोड गोड बोलत तो तिला घेऊन नालासोपाऱ्याला निर्जनस्थळी गेला. त्याने गांजा पाजल्याने तिची शुद्ध हरपली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती क्राइम ब्रांच कक्ष ९च्या वरिष्ठ अधिकाºयाने दिली. १७ जूनला ही मुलगी घरातून गायब झाली. या प्रकरणी डी.एन.नगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ही मुलगी १८ जूनला बेशुद्धावस्थेत अंधेरीच्या एका हॉटेलजवळ सापडली.पोलिसांनी तिच्या पालकांना बोलावून त्यांच्या मदतीने तिला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. यात तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवला.संबंधित प्रकरणाचा समांतर तपास करणाºया क्राइम ब्रांचच्या कक्ष ९चे प्रमुख पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कोरके, दराडे, पोलीस उपनिरीक्षक कोरे, पेडणेकर, नाईक, सावंत आणि हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी चौकशी सुरू केली. यात गुप्ता नालासोपाºयाला लपल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी नालासोपाºयाला जाऊन गुप्ताच्या मुसक्या आवळल्या. एका टॅलेंट शोमध्ये गुप्ता हा द्वितीय क्रमांकाने विजयी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.