Join us

बलात्कार करून हत्या करणा:या टेलरला अटक

By admin | Updated: October 29, 2014 01:51 IST

गोवंडीतील अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या प्रकरणातील आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. कासीम शेख (30) असे या आरोपीचे नाव आहे.

मुंबई : गोवंडीतील अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या प्रकरणातील आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. कासीम शेख (30) असे या आरोपीचे नाव असून, मुलीच्या घराशेजारी त्याचे दुकान आहे. शिवाजीनगर पोलीस व गुन्हे शाखेच्या चेंबूर युनिटने संयुक्तपणो तपास करून या गुन्ह्याचा तपास लावला.
26 ऑक्टोबरला दुपारी घराबाहेर खेळणारी 12 वर्षाची मुलगी बेपत्ता झाली. दुस:या दिवशी बैंगनवाडी परिसरातील एका कचराकुंडीत या मुलीचा चटईत गुंडाळलेला व हात-पाय बांधलेला मृतदेह आढळला. वैद्यकीय चाचणीत या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत शिवाजीनगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या चेंबूर युनिटने संयुक्तपणो तपास सुरू केला.
मृतदेहाच्या पाहणीत आरोपी कोण असावा याचा अंदाज पोलिसांनी बांधला होता. पोलिसांनी मुलीच्या मित्र-मैत्रिणींकडे, पालकांसह शेजारी, नातेवाइकांकडे चौकशी सुरू केली होती.  त्यातच त्यांनी मुलीच्या घराशेजारी टेलरिंग दुकान असलेल्या कासीमकडे चौकशी सुरू केली. चौकशीत क्षणाक्षणाला कासिम परस्परविरोधी माहिती देत होता. त्याची अवस्था आणि  मिळणा:या परस्परविरोधी माहितीवरून पोलिसांचा संशय बळावला. संशयाची सुई त्याच्याच भोवती रोखली गेल्याने पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली. अखेर त्याने मुलीच्या हत्येची कबुली दिली, अशी माहिती मिळते. (प्रतिनिधी)
 
ही मुलगी काही कामानिमित्त दुकानात आली होती. ओळख असल्याने थट्टामस्करी सुरू झाली. मस्करीत तिला ढकलले, तेव्हा ती पडली. तिला मार लागला आणि ती बेशुद्ध झाली. मुलगी बेशुद्धावस्थेत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मात्र ती शुद्धीत येऊ लागली. तिला शुद्ध आली असती, तिने तक्रार केली असती, म्हणून तिचा गळा आवळून ठार केले. मध्यरात्री   मृतदेह कचराकुंडीत टाकला, अशी कबुली कासीमने दिल्याचे समजते.