Join us

अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून बलात्कार

By admin | Updated: December 3, 2015 02:20 IST

भांडुप येथील एलबीएसच्या फूटपाथवर राहत असलेल्या नऊ वर्षांच्या एका बालिकेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नवघर

मुंबई : भांडुप येथील एलबीएसच्या फूटपाथवर राहत असलेल्या नऊ वर्षांच्या एका बालिकेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी प्रकाश बर्नाबस (वय ३३) व संतोष पुजारी (२४) यांना अटक केली आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. एलबीएस परिसरातील फूटपाथवर एक महिला दोन लहान मुलींसह राहते. २७ नोव्हेंबरला जेवण आणण्यासाठी गेली असताना, तिच्या एका मुलीला दोन माणसे घेऊन गेली होती. घरी परतल्यावर त्या महिलेला घडलेला प्रकार तिच्या लहान मुलीने सांगितला. त्यानंतर या प्रकाराची पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अ‍ॅड. अरुण मिस्त्रा यांना घरी जात असताना, भांडुप गांव परिसरातील एका बस थांब्यावर एक मुलगी जखमी अवस्थेत पडल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला ही बाब कळविली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संबंधित मुलीला ताब्यात घेऊन, सायन रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या मुलीच्या लहान बहिणीने सांगितलेल्या वर्णनावरून आरोपीचे रेखाचित्र तयार केले. ते दोघेजण परिसरातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, त्यांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)