Join us

अल्पवयीन मुलीवर बाप-लेकांचा बलात्कार

By admin | Updated: April 2, 2015 00:30 IST

अल्पवयीन मुलीवर तिच्या बापासह सख्ख्या भावाने अनेकदा बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेची शिक्षिका व समाजसेविकेमुळे

नवी मुंबई : अल्पवयीन मुलीवर तिच्या बापासह सख्ख्या भावाने अनेकदा बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेची शिक्षिका व समाजसेविकेमुळे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोपरी येथे राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. काही वर्षांपासून बाप व दोन भावांच्या वासनेला ती बळी पडत आली आहे. अखेर मंगळवारी हा प्रकार उघडकीस आल्याने या छळातून तिची सुटका झाली. वाशीतील शाळेमध्ये आठवीत शिकणारी ही विद्यार्थिनी वर्गात झोपत असे. शाळेच्या शिक्षिकेने चौकशी केली असता तिने अत्याचाराची माहिती दिली. त्यानुसार शिक्षिकेने ‘चेतना फाऊंडेशन’च्या समाजसेविका कविता भाटिया यांना माहिती दिली. बुधवारी त्यांनी मुलीच्या घरी जाऊन विचारपूस केली. तपास सुरू असल्याचे पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.वडील रामनरेश मिश्रा हा टॅक्सीचालक असून रात्री मुलीला मसाज करायला सांगून बलात्कार करत. मोठ्या भावानेही अनेकदा तिच्यावर बलात्कार केला केला. नववीत शिकणारा मधला भाऊ देखील अश्लील चाळे करायचा. याप्रकरणी तिने आईला सांगितले असता आईने दोन्ही मुलांना मारले होते. यानंतरही अत्याचार सुरूच होता. (प्रतिनिधी)