Join us

दिंडोशीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: December 19, 2015 02:09 IST

गोरेगाव दिंडोशी परिसरात एका साडेतीन वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी ३५वर्षीय वाहनचालकाला दिंडोशी पोलिसांनी

मुंबई : गोरेगाव दिंडोशी परिसरात एका साडेतीन वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी ३५वर्षीय वाहनचालकाला दिंडोशी पोलिसांनी अटक केली असून, त्याची अधिक चौकशी सुरू आहे.दिंडोशी परिसरात पीडित मुलगी तिच्या पालकांसोबत राहते. आरोपी हा तिच्या शेजारी राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ही मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपीने तिला त्याच्या घरी बोलावले व तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने ही बाब आईला सांगितली. तिच्या आईने दिंडोशी पोलिसात तक्रार दाखल केली. या मुलीवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)