Join us

बलात्कार खटल्यात शिक्षक निर्दोष

By admin | Updated: September 13, 2015 04:36 IST

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणातून एका खासगी शिकवणीच्या शिक्षकाची विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष सुटका केली़ महत्त्वाचे म्हणजे पीडित मुलीचा जन्मदाखलाच

मुंबई: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणातून एका खासगी शिकवणीच्या शिक्षकाची विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष सुटका केली़ महत्त्वाचे म्हणजे पीडित मुलीचा जन्मदाखलाच सरकारी पक्षाने सादर केला नाही़ तसेच शरीरसंबंध संमतीनेच झाल्याचे पीडित मुलीने अ‍ॅड़ प्रकाश साळशिंगीकर यांनी घेतलेल्या उलटतपासणीत न्यायालयाला सांगितले़ त्याची नोंद करून घेत न्यायालयाने यातील आरोपी कलिम इस्माईल शेखची निर्दोष सुटका केली़साकीनाका येथे शेख खाजगी शिकवणी घेतो़ पीडित मुलीचे २०१२ मध्ये दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेखने तिला अन्य मुलांची शिकवणी घेण्यासाठी बोलावले़ त्यावेळी शेखने तिच्यावर अत्याचार केला़ पोटात दुखू लागल्याने रूग्णालयात दाखल केल्यानंतर पीडित मुलगी गरोदर असल्याची बाब समोर आली व तिचा नैसर्गिकरीत्या गर्भपात झाला़ डीएनए चाचणीत शेखसोबत झालेल्या शरीरसंबंधामुळे पीडित मुलगी गरोदर झाल्याचे स्पष्ट झाले़ त्यानुसार शेखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ विशेष न्यायालयात याचा खटला चालला़ शेखकडून अ‍ॅड़ साळशिंगीकर यांनी युक्तिवाद केला़ उभयंतांमध्ये हा प्रकार संमतीने झाला असल्याची कबुली पीडित मुलीने दिली आहे़ तसेच पीडित मुलगी घटना घडली तेव्हा अल्पवयीन होती याचा पुरावा न्यायालयात सादर झालेला नाही़ तेव्हा शेखची निर्दोष सुटका करावी, अशी मागणी अ‍ॅड़ साळशिंगीकर यांनी केली़ न्यायालयाने ती मान्य केली़