भार्इंदर : भाजपाचा युवा शाखेचा मीरा-भार्इंदर शहर जिल्हा उपाध्यक्ष विकी कपूर याने बोरीवली येथील बारबालेवर गेल्या दोन वर्षांपासून बलात्कार करून तिची सुमारे ५० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा रोड येथे राहणारा विकी हा गेल्या काही वर्षांपासून बोरीवली येथील चार्वाक बारमध्ये जात होता. २०१३ मध्ये त्याची तेथील बारबालेसोबत ओळख झाली होती. ओळखीचा गैरफायदा घेत विकीने तिला लग्नाचे आमिष दाखवत अनेकदा बलात्कार केला. दरम्यान, त्याने हौसमौज भागविण्यासाठी त्या बारबालेकडून सुमारे ५० लाख उकळले होते. याबाबत आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तिने २८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास मीरा रोड पोलीस ठाणे गाठले. तिने दिलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी विकीवर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अटक होण्याच्या भीतीने विकीने न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जमीन मिळवल्याने तूर्तात त्याची अटक टळली आहे. (प्रतिनिधी)
भाजपाच्या स्थानिक युवा जिल्हा उपाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा
By admin | Updated: July 30, 2015 01:34 IST