मुंबई : मालवणीत एका गर्दुल्याने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ३० वर्षांच्या तरुणाच्या सतर्कतेमुळे तिची यातून सुटका झाली. त्याने या गर्दुल्याला पकडून मालवणी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाडमध्ये राहणारी आणि घरकाम करणारी ही पीडित महिला गुरुवारी दुपारी या पुलावरून तिच्या घरी परतत होती. त्या वेळी गणेश सेजवाल नामक इसमाने तिची ओढणी धरून तिला झाडाझुडपात नेले आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला. यावेळी खलीक सिद्धिक्की नामक तरुण त्याचा माग काढत महिलेच्या मदतीसाठी धावून गेला. पोलिसांनी सेजवालवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)
मालवणीत महिलेवर बलात्काराचा प्रयत्न
By admin | Updated: October 7, 2016 05:52 IST