‘बाजीराव मस्तानी’ च्या शूटिंगसाठी उशीर होऊ नये म्हणून रणवीरने फिल्मसिटीच्या जवळ गोरेगावमध्ये पाच आठवड्यांसाठी एक अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. नुकतेच त्याने भूमिकेसाठी टक्कलही करून घेतले आहे. रणवीरला मुंबईच्या ट्रॅफिकचे हाल माहीत आहेत. सूत्रांनुसार प्रवासात जो वेळ वाया जातो, तो वाचविण्यासाठी रणवीरने हा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे शूटिंग संपत नाही तोपर्यंत रणवीर याच अपार्टमेंटमध्ये राहणार आहे.
रणवीरने भाड्याने घेतले घर
By admin | Updated: October 24, 2014 00:22 IST