Join us

खंडणीखोर पोलीस प}ी गजाआड

By admin | Updated: September 14, 2014 01:27 IST

रेशनिंग दुकानदार, मसाज पार्लर चालकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणा:या पाच जणांच्या टोळीचा मुलुंड पोलिसांनी भांडाफोड केला आहे.

मुंबई : रेशनिंग दुकानदार, मसाज पार्लर चालकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणा:या पाच जणांच्या टोळीचा मुलुंड पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या टोळीची सूत्रधार महिला असून, ती पोलीस प}ी असल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आल्याचे मुलुंड पोलिसांनी सांगितले. स्मिता चंद्रकांत शिंदे (35) असे तिचे नाव आहे.
मुलुंड पोलिसांनी स्मितासह अंजना प्रकाश गायकवाड (28), जयश्री रवींद्र ऐवळे (36), विशाल भीमराव कांबळे (25) आणि कलीम नुरमोहम्मद शेख (26) यांना गजाआड केले. यापैकी विशाल हा पूर्वी होमगार्ड होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मिता चेंबूरच्या शेल कॉलनीत राहते. तिचा पती चंद्रकांत वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची मुंबई अध्यक्ष असल्याचा दावा करत तिने व तिच्या टोळीने मुंबईसह नवी मुंबईतल्या अनेक रेशनिंग दुकानदार, पार्लर चालकांना धमक्या दिल्या होत्या. तुमच्या दुकानात चालणारा काळाबाजार, अवैध धंदे उघड करू, असे धमकावून ही टोळी लाखोंची खंडणी मागत असे. काल दुपारी ही टोळी मुलुंड, आर.पी. रोडवरील रावजी वेलजी गाला या रेशनिंग दुकानात धडकली. दुकानदाराला धमकावून या टोळीने 4क् हजार रुपयांची मागणी केली. तेथून ही टोळी दुपारी 4च्या सुमारास अमरनगर येथील कुलदीप कन्हैयालाल यांच्या रेशनिंग दुकानावर पोहोचली.  रेशनिंग केंद्रावरील तांदूळ बाजारभावाने विकल्याचा आरोप करत टोळी 2क् हजारांची खंडणी मागू लागली. मात्र केंद्रचालक कुलदीप भीक घालत नाहीत हे पाहून टोळीने पोलीस नियंत्रण कक्षात फोन फिरवला. त्यावरून मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कुलदीप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही माहिती मिळताच मुलुंडमधील अनेक रेशनिंग दुकानचालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुलदीप आणि अन्य केंद्रचालकांनी या टोळीच्या कारनाम्यांचा पाढा पोलीस ठाण्यात वाचला. पोलिसांसमक्षच भांडाफोड झाल्याने टोळीची गोची झाली. पुढे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश मनसुख आणि अन्य अधिका:यांनी स्मिता आणि तिच्या साथीदारांकडे स्वतंत्रपणो चौकशी केली. त्यात कलीम आणि विशालने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार टोळीविरोधात धमकावणो, खंडणी उकळणो असा गुन्हा नोंदविण्यात आला. पाचही जणांना गजाआड करण्यात आले. न्यायालयाने या सर्वाना 15 सप्टेंबर्पयत 
पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  (प्रतिनिधी)
 
वडाळा टीटी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या चंद्रकांत शिंदे याचीही चौकशी करण्याच्या तयारीत मुलुंड पोलीस आहेत. टोळीची मुख्य सूत्रधार स्मिता ही चंद्रकांतची प}ी आहे. या गुन्ह्यात चंद्रकांतचा सहभाग आहे का, हे पोलीस तपासणार आहेत.
 
मुंबई, नवी मुंबईत खंडणीसत्र
या टोळीने मुंबईसह नवी मुंबईतील अनेक रेशनिंग केंद्र चालक, पार्लर आणि अन्य व्यावसायिकांकडून खंडणी उकळली असावी, असा संशय मुलुंड पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलीस सखोल चौकशी करीत आहेत. 
 
शाहूनगर, चेंबूर ठाण्यातही गुन्हा
धारावीच्या शाहूनगर आणि चेंबूर पोलीस ठाण्यातही या टोळीविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. येथील मेघजी भानुशाली या रेशनिंग केंद्रचालकाने या टोळीविरोधात 60 हजार रुपयांची खंडणी उकळल्याची तक्रार केली होती.  चेंबूर परिसरातील रेशनिंग दुकानदाराकडूनही या टोळीने गुरुवारी 15 हजार रुपये घेतले होते. त्या प्रकरणीही चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.