Join us

खंडणीखोर बारबाला गजाआड

By admin | Updated: March 15, 2015 01:07 IST

विवाहबाह्य संबध पत्नीला सांगेन, अशी धमकी देत एका तरुणाकडून २० लाख रुपयांंची खंडणी मागणाऱ्या बारबालेला नवघर पोलिसांनी गजाआड केले.

मुंबई : विवाहबाह्य संबध पत्नीला सांगेन, अशी धमकी देत एका तरुणाकडून २० लाख रुपयांंची खंडणी मागणाऱ्या बारबालेला नवघर पोलिसांनी गजाआड केले. या प्रकरणातील तरूण मुंबई महापालिकेचा अभियंता आहे. नीलम चौहान असे बार बालेचे नाव असून ती भार्इंदरला राहाते. फेब्रुवारीतील शेवटच्या आठवड्यापासून पैशांंच्या लालसेपोटी नीलमने या अभियंत्याला धमकावण्यास सुरुवात केली होती.काही दिवसांपूर्वीच अभियंत्याची नीलमशी ओळख झाली होती. ओळख वाढली आणि दोघांमध्ये विवाहबाहय संबंध निर्माण झाले. काही दिवस सुरळीत गेल्यानंतर अचानक नीलमने अभियंत्याकडे पैशांची मागणी सुरू केली. सुरूवातीला तिने दोन मुलांच्या शिक्षणाचे कारण पुढे केले. अभियंत्याने काही वेळा नीलमला आर्थिक मदत केली. मात्र पुढे नीलम नशेसाठी पैसे मागते, हे लक्षात येताच अभियंत्याने हात आखडता घेतला. हे लक्षात येताच नीलमने अभियंत्याला थेट धमकावण्यास सुरुवात केली. पत्नीसमोर पितळ उघडं करेन. तोंड बंद ठेवण्यासाठी २० लाख दे, अशी मागणी नीलमने केली. हळुहळू नीलम अभियंत्याच्या इमारतीखाली येऊन धमक्या देऊ लागली. रोजच्या जाचाला कंटाळून त्याने नवघर पोलिसांना तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि खंडणी स्वीकारताना नीलमला अटक करण्यात आली. च्खंडणी मागताना सुरुवातील तिने दोन मुलांच्या शिक्षणाचे कारण पुढे केले.च्नीलम नशेसाठी पैसे मागत आहे हे लक्षात येताच या अभियंत्याने पैसे देण्यात नकार दिला.